आज पुन्हा काहीतरी लिहावसे वाटते
आयुषच्या कॅनवास वर
काहीतरी रेखाटावे वाटते
आजवरच्या प्रवासाला
पुन्हा अनुभवू
असे वाटते
मग नवीन काहीतरी
उगाच शिकू वाटते
जुन्या लोकांना
पुन्हा घटं भेटू
असे वाटते
आणि अनोळखी कोणाशीतरी
नवीन ओळख बनवू वाटते
आई करते ती भाजी
पुन्हा तिच्यासारखीच बनवू
असे वाटते
मग आपल्या पाककलेलातरी
एकदा अजमावू वाटते
एखाद्या पिकनिकला
पुन्हा उनाड जाऊ
असे वाटते
नाहीतर रोजच्याच रुटीनलातरी
वेगळे जगावे वाटते
साऱ्यानसारखे जिगीविषु होऊन
राजमार्गावर शर्यतीत पाळू
असे वाटते
नाहीतर आपली पाऊलवाट तरी
वेगळी असावी वाटते
सकाळच्या साखर झोपेत
पुन्हा नवीन स्वप्ने बघू
असे वाटते
मग भल्या पहाटे उठून कधीतरी
सूर्याला उगवताना पाहावे वाटते
एकटेच पायी
पुन्हा चालू
असे वाटते
आणि जिवाभावाच्या मैत्रिणीची पावलेतरी
सोबत असावी वाटते
आज पुन्हा काहीतरी लिहावसे वाटते
आयुषच्या कॅनवास वर
काहीतरी रेखाटावे वाटते